अमळनेर कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
22

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीकडून चोपडा तालुक्यातील लासूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील लासूर गावात अमळनेर कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत अंतिम वर्षातील विद्यार्थिनी आरती नवनाथ लांडगे, नम्रता चंद्रकांत कोळी, गायत्री मोतीलाल परदेशी, ऋतिका संजय चव्हाण यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत सर्वेक्षण केले. यावेळी लासूरचे सरपंच श्रीमती जनाबाई सुखदेव माळी, माजी सरपंच निंबाजी राजाराम वाघ, उपसरपंच अनिल जिजाबराव पाटील, ग्रामसेवक विश्वनाथ काशिनाथ चौधरी, प्रवीण इंधा, लीलाधर पाटील, गुणवंत महाजन, तुषार पाटील यांनी कृषीदुतांचे स्वागत केले.

कार्यक्रमात अमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, रावे प्रोग्राम ऑफिसर प्रा. गिरीश पाटील, उपप्राचार्य प्रा. संदीप साळुंखे, प्रा. तुषार देसले, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. शिवाजी गावित, प्रा. घनश्याम पवार, प्रा. अमोल घाडगे, प्रा.सुनील गावित, प्रा.महेश चव्हाण, प्रा.राम रेजितवाड, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा.सुदीप पाटील, प्रा.हर्षदा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत गावागावातील पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण कीड, पिक आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेती विषयक विविध समस्या तसेच त्यावरील उपाय ही प्रात्यक्षिक तसेच इतर शेतीसंबंधी माहिती यावर मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here