बोदवड : प्रतिनिधी
महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन नुकतेच करण्यात आले. ध्यानचंद हे माजी भारतीय हॉकी खेळाडू आणि कर्णधार होते. भारतातील आणि जागतिक हॉकीमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. त्यांची जन्मतारीख भारतात “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरी केली जाते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपप्राचार्य व्ही.पी. चौधरी यांचे ‘क्रीडा जगत’वर मार्गदर्शन झाले. यावेळी प्रभारी क्रीडा संचालक डॉ.अमर वाघमोडे, डॉ.रत्ना जवरस, हेमलता कोटेचा, डॉ.रुपेश मोरे, वैशाली संसारे, अजित पाटील, धीरेंद्र कुमार, अनिल धनगर, शरद पाटील, शेखरसिंग चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.