रा.काँ.एस.पी.गटाच्या जिल्हा बैठकीत याद्यांमधील घोळ मांडला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आकाशवाणी चौकाजवळील रा.काँ.शरद पवार गटाच्या कार्यालयात बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षांची जिल्हा बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते. बैठकीला प्रदेश सचिव रवींद्र पाटील, दिलीप खोडपे उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील दुबार नावे, वगळलेली नावे, नवीन जोडलेली नावे यांच्यावर हरकती घेण्यासाठी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व तालुकाध्यक्षांना हरकतींसाठी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या याद्या दिल्या. आगामी दिवसांमध्ये प्रत्येक तालुकास्तरावर यासंदर्भातील हरकती घेण्यात येतील. अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या गेल्या विधानसभेच्या याद्यांमधील घोळ हा बैठकीत मांडण्यात आला. सर्व तालुक्यांमध्ये तालुका निरीक्षक बैठकीत नेमण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
बैठकीला जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा सरचिटणीस वाय.एस.महाजन, महिलाध्यक्षा मंगला पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवा जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, प्रदेश पदाधिकारी उमेश पाटील, रमेश बहारे, विकास पाटील, कल्पिता पाटील यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, तालुका निरीक्षक उपस्थित होते.