बापजी रुग्णालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर

0
17

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते.

शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे पी.एल.व्ही. रमेश पोतदार यांनी ‘मानसिक आरोग्य दिना’वर आधारीत कविता सादर केली. बापजी रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप देशमुख यांनी ‘मानसिक आरोग्य दिवस’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच न्या.एन.के. वाळके यांनी ‘कल्याणकारी योजना आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यातील संपर्क तोडणे यावरील उपाययोजना’, ‘लाभार्थ्यांना योजनेशी जोडण्यासाठी पावले उचलणे, ‘इतर कोणत्याही समस्यांमध्ये कायदेशीर सेवा सुनिश्चिती करणे’ ह्या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शिबिराला रोटरीचे अल्पेश बागड, धीरज पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एन.एम.पाटील, देवेश पवार, भिला सोनवणे, बापुजी चव्हाण, बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाचे काम तालुका विधी सेवा समितीतर्फे डी.के.पवार, तुषार भावसार यांनी पाहिले. प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे अध्यक्ष हर्षद ढाके, सुत्रसंचालन तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. संग्रामसिंग शिंदे तर रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे योगेश पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here