खासगी शिकवणीबद्दल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली दखल

0
13

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमधील काही शिक्षक शाळेतील जास्तीचे क्लास म्हणून घरी खासगी क्लासेस चालवित होते. यासंदर्भात दैनिक ‘साईमत’ने ठळक मथळ्याखाली प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भोई यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यामुळे शाळेत खासगी क्लासेस घेणार नाही, असे हमी पत्र शिक्षकांकडून मुख्याध्यापकांनी लिहून घेतले आहे. त्यामुळे शिक्षकांनी खासगी क्लासेस घेणे बंद केले आहे.

तहजीब नॅशनल उर्दु शाळेत काही संचालक शिस्त चांगली लावतात तर काही शिक्षक आपलेच नातेवाईक संस्थेत नोकरीला आहेत. त्यांचे संरक्षण म्हणून शाळेत टाईमपास करतात. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कामात अडथळे आणत असतात. संचालक, सचिव यांच्यात आपसात मतभेद आहेत. सचिव आपल्या कामांबाबत संचालकांना विश्वासात न घेता सर्व कामे परस्पर करत असतात. सचिव आणि काही संचालकांनी आपलेच घरची व नातेवाईक यांनाच शाळेत नोकरीस घेतले आहे. शाळा आमच्या मालकीची आहे, असे ते बाहेर दर्शवितात. सचिव भोळे, भाबडे दिसतात, गोड बोलतात. मात्र, शाळेत खूप भ्रष्टाचार आहे, असाही पालकांमधून चर्चेचा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here