साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात क्रांतीसूर्य संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर होत्या. यावेळी हिवरसिंग राठोड, चरणसिंग राठोड या पालकांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मयुरी राठोड, नंदिनी राठोड, प्रियंका राठोड या विद्यार्थिनींनी बंजारा गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. याप्रसंगी दुर्गा राठोड, जागृती चव्हाण, राणी राठोड यांनी मनोगतातून क्रांतीसूर्य सेवालाल महाराज यांच्या कार्याची माहिती विशद केली. माधुरी बारी यांनी शिक्षक मनोगतातून सेवालाल महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुनील पवार, संदीप बनसोडे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन राजेंद्र सोनवणे तर आभार हरीभाऊ राऊत यांनी मानले.
