साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.पी.पी.चौधरी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी श्रीमती प्रा. यु .बी.पाटील, प्रा. के. वाय. देवरे, निवृत्त शिक्षक डी.एस.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.