साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, संदीप गारुंगे, संदीप बागडे, गोपाल बाटुंगे, वीर दहियेकर, पंकज गागडे, जितू नेतलेकर, पिंटू नेतलेकर, राहुल दहियेकर, कृष्णा बाटुंगे आदी समाजबांधव उपस्थित होते.