Malkapur : अनुराबादमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

0
3

आजी-माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.

साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील अनुराबाद येथील मराठी शाळेमध्ये ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आजी आणि माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात भारतीय सैन्यात कार्यरत असलेले गावाचे सुपुत्र रामेश्वर चव्हाण तसेच माजी सैनिक प्रकाश उमाळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या गावातील युवक देशसेवेत कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त करत सरपंच ज्ञानदेव एकनाथ ढगे यांनी सैनिकांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला उपसरपंच निलेश फिरके, ग्रामपंचायत सदस्य संजय बोराडे, नरसिंग चव्हाण, विश्वनाथ नेमाने, रामा फिरके, शंकर क्षिरसागर, प्रसन्न कोलते, ग्रामविकास अधिकारी अनिल तेलंग, मुख्याध्यापक श्री.गव्हाणे, श्री.किस्ते, अंगणवाडी सेविका, मदतनीस, रोजगार सेवक, संगणक परिचारिका, आशासेविका तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील सैनिकांचा सन्मान हा अनुराबादच्या गौरवपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग असून अशा उपक्रमांमुळे देशसेवेप्रती असलेला आदर अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here