साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शासन परिपत्रानुसार सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा प्रशिक्षण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंतीनिमित्त (अंत्योदय दिवस) त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपायुक्त अविनाश गांगोडे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सह आयुक्त अभिजीत बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.