साईमत लाईव्ह जरंडी प्रतिनिध
राष्ट्रनिष्ठा ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली.अशा विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी जरंडी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना व त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले यावेळी सिद्धार्थ मोरे,सुरेश चनाल, अशोक सावळे,सोपान मोरे,संतोष मोरे,सिद्धार्थ दांडगे,मधुकर सोनवणे,प्रदीप जगताप,संतोष मोरे,भिका शिंदे,ज्ञानेश्वर मोरे,रमेश मोरे, त्र्यंबक मोरे,यशवंत कोतकर,प्रकाश मोरे,नामदेव साळवे, राहुल दांडगे, सागर साळवे, यांच्या सह इतर बौद्ध समाज महिला भगिनी व बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.