भगीरथ इंग्लिश स्कुलचे फ्लोअर बॉल स्पर्धेत घवघवीत यश

0
97

स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील संघाने मिळविले अजिंक्यपद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नंदुरबार जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशनद्वारा दोंडाईचा येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान झालेल्या फ्लोअर बॉल स्पर्धेत खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलने घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेसाठी शाळेतून १९ वर्ष वयोगटातून गेलेल्या संघाने अजिंक्यपद मिळविले. संघातील इ.नववीचा विद्यार्थी विवेश चौथनकर विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गोलकीपर म्हणून निवड झाली.

१४ वर्ष आतील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त करत ब्रांझ पदक मिळविले. तसेच १४ वर्षाच्या आतील मुलींच्या गटाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक प्राप्त केले. संघाला मार्गदर्शन शाळेतील शिक्षक जे.पी.धनगर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षक जे.पी.धनगर यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यांनी केले अभिनंदन

शाळेच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, ज.जि.माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड, शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के.आर.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here