उच्च शिक्षितांसह बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी ।
शहरातील गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शनिवारी, १० मे रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी विविध पदांसाठी भरती करणार आहे. मेळाव्यात बीई/बी.टेक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), कोणतेही पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड्स) आणि बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
कंपनीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. बीई/बी.टेक उमेदवारांसाठी २० हजार रुपये, डिप्लोमा उमेदवारांसाठी १८ हजार रुपये, आयटीआय उमेदवारांसाठी १६ हजार रुपये आणि बारावी पास उमेदवारांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना वेतन निश्चित केले आहे.इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचा बायोडाटा, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि ४ पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे.
यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड निवड झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा पुरविणार आहे. त्यामध्ये मोफत वाहतूक, मोफत कॅन्टीन (भोजन), मोफत चहा आणि नाश्ता तसेच सवलतीच्या दरात निवास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
युवकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन
रोजगार मेळाव्याबद्दल अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंका असल्यास, इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे यांच्याशी ९३७०३२५२५२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. जळगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.