म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या भोंगळ कारभारात ग्रामसेवक सुद्धा सहभागी?

0
21

यावल : प्रतिनिधी 

गजानन मधुकर सोनार या ठेकेदारास म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकामासाठी वर्कऑर्डर मिळाल्यानंतर दुसऱ्याच गट नंबर मध्ये बांधकाम सुरु असल्याने याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात नेमकी काय नोंद आहे? याबाबतची माहिती मिळण्यासाठी म्हैसवाडी येथील किरण गोपाळ पांडव यांनी ग्रामसेवक यांच्याकडे दि.9 जून 2022 रोजी अर्ज केला आहे परंतु ग्रामसेवकांने मुदतीत व मुदत संपल्यावर सुद्धा आज दि. 29 जुलै 2022 पर्यंत माहिती न दिल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम संदर्भातील ठरावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाबाबत गजानन मधुकर सोनार यांना वर्क ऑर्डर दिली आहे ही वर्क ऑर्डर देताना म्हैसवाडी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबाबत नेमका कोणत्या गट नंबर बाबत ठराव करून प्रस्ताव पाठविला आहे आणि त्या प्रस्तावानुसार वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गजानन मधुकर सोनार या ठेकेदाराने दुसऱ्याच गट नंबर मध्ये बांधकाम सुरू केले आहे याबाबत म्हैसवाडी ग्रामपंचायत ने कार्यकारी अभियंता यांची वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर पुन्हा ठराव केला आहे का? प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत ग्रामसेवक,यांच्यासह ठेकेदार,कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी सर्वांनी आपल्या सोयीनुसार आणि संगणमताने 1 कोटी 21 लाख 28 हजार रुपयांचे बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे आणि ठरावाप्रमाणेच केले आहे का? जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग,म्हैसवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदार यांचा मोठा भोंगळ कारभार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here