कार्यक्रमात पारंपरिक खेळ, नृत्यासह गीतांचे सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रगती शाळेत गोपाळकालानिमित्त शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी दहीहंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात केले होते. चिमुकल्यांपासून ते वरिष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती कुलकर्णी यांनी केले होते. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख घालून दहीहंडीचा आनंद घेतला. सभोवतालचे वातावरण “गोविंदा आला रे आला” च्या जयघोषणांनी परिसर दणाणला होता. शिक्षकांसह पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत टाळ्यांचा कडकडाट केला.
कार्यक्रमात पारंपरिक खेळ, नृत्य आणि गीतांच्या सादरीकरणानेही रंगत आणली. शेवटी दहीहंडी फोडल्यानंतर दही, गोळ्या व गोडधोड वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, एकता आणि पारंपरिक सणांविषयी जिव्हाळा वाढतो, असे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक मनीषा पाटील, प्र. मुख्याध्यापक नम्रता पाटील, शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
