विविध उपाययोजनांसह शासकीय विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा

0
14

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

 जिल्हा आपत्ती निवारण आराखडा तयार करून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवत तात्काळ उपाययोजनासह आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी येथे दिल्या.

जिल्हा आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ.प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ, चंद्रकांत गवळी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  प्रसाद म्हणाले की, 15 व्या वित्त आयोगाद्वारे राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करणेसाठी निधी मंजुर केलेला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यांमधील विविध आपत्तीमुळे होणारी जिवित व वित्त हानी टाळण्याकरीता त्या आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. प्रस्ताव सादर करतांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 6 मार्च 2023 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा.

धोके जोखीम, मुल्यमापन, आपत्ती मुळे बाधीत होणारे घटक, आपत्ती प्रवण विभागातील जनसामान्यांचे विचार, प्रश्नावली. अंदाजीत खर्च, नकाशा, प्रोजेक्ट प्लॅन आणि प्रस्ताव सादर करतांना सखोल अभ्यास करुनच प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे उपनियमान्वये कोणत्याही आपात्कालीन प्रसंगात प्रतिबंधात्मक उपययोजना, आपत्ती सौम्यीकरण तात्काळ प्रतिसाद, मदत व पुनर्वसन, तसेच कार्यकारी यंत्रणाशी समन्वय करावयाचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाचे सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीत पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, अधीक्षक अभियंता, महावितरण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,  जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here