साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर या बिलापोटी अवाजवी रक्कमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे आमरण गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. ‘शासन आपल्या दारी, अधिकारी मागतात टक्क्यांची भागेदारी’ असे चित्र सध्या दिसत आहे. या उपोषणात नावासहित नगरपालिकेल्या वरिष्ठ एक महिला अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप म्हणजे मंत्रालयात ‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातयं’ अशी वस्तुस्थिती सध्या राज्यामध्ये पहावयास मिळत आहे.
सुरेश गणसिंग पाटील यांनी ‘सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँड सर्व्हिसेस’ नावाने नगरपरिषदेकडून जंतूनाशके पुरविणे व घंटगाड्या दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे घेतली होती. या कामाची रक्कम ३ एप्रिल २०२३ रोजी १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी बिलापोटी ६ लाख रुपये अदा केलेले आहेत. परंतु उर्वरित बिलांसाठी गेल्या ४५ ते ६ महिन्यांपासून वारंवार नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांना भेटून बिलाची मागणी केली. अगोदर ३० टक्क्यांप्रमाणे २ लाख ७० रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा, अन्यथा बिल मिळणार नाही. तुम्ही कुठेही गेलात तरी मला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात. त्यामुळे रक्कम दिल्याशिवाय चेक मिळणार नाही, असे सांगून अडवणूक करीत असल्याचा आरोप आमरण उपोषणकर्ते सुरेश पाटील यांनी केल्याने प्रशासन विभागात अधिकाऱ्यांमध्ये खरंच पैसे घेतल्याशिवाय काम केली जात नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. सर्वच प्रशासकीय विभागात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारांची कीड लागलेली दिसत आहे.