Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा
    मुंबई

    Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा

    saimatBy saimatMarch 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई / प्रतिनिधी

    राज्यातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

    राज्यातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. एलपीजी उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये यासाठी रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे नियमित माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

    काळाबाजार रोखण्यासाठी ८ मार्चपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून व्हॉट्सअॅप क्रमांक ९७६९९१९२२१ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    दरम्यान, कंटेनर अडकल्यामुळे नाशवंत मालाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून कंटेनरवरील डॅमरेज शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारही या विषयावर सकारात्मक विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

    इंधन दरवाढीबाबत सध्या कोणतीही वाढ झालेली नसली तरी भविष्यातील स्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे. सध्या २० टक्के इथेनॉल मिश्रण लागू असून, गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास कोळसा व रॉकेलसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याचा विचार केला जात आहे. केरोसिन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

    गहू आणि डाळींच्या दरात मोठी वाढ झालेली नसून काही ठिकाणी किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही जहाजे अडवली गेली होती; मात्र काही जहाजे आता मुंबई, कांडला आणि कोची बंदरांवर पोहोचली आहेत. भारत सरकारकडून रशिया, इराण आदी देशांकडून इंधन पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    गेल्या काही दिवसांत गल्फ देशांतील तणावामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जहाजांमधून इंधन उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत घरगुती वापर, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने पुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Political : ‘राजकीय गणिते’ पुन्हा मांडणीवर; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात?

    March 18, 2026

    Jalna Maharashtra : जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; गहू उत्पादक शेतकरी चिंतेत

    March 18, 2026

    Bullet Train : मुंबईत बुलेट ट्रेन स्थानकांना मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी; प्रवाशांना ‘लास्ट माइल’ सुलभ

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.