गोरबंजारा साहित्य अकादमीचे काम प्रगतीपथावर

0
56

जामनेरात नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन

साईमत।जामनेर।प्रतिनिधी।

सरकारच्यावतीने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोहरागड येथे ७०० कोटींचे विकास कामे, मुंबई येथे बंजारा समाज कल्याण भवन आणि गोरबंजारा साहित्य अकादमीचे कामही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनेही बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना केली आहे. यानिमित्त सकल बंजारा व लमाण समाजाच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला. हा सत्कार विनम्रतापूर्वक स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे सत्काराला उत्तर देताना मंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले. बंजारा आणि लमाण समाजातर्फे जामनेरातील शिवाजी नगरातील एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ना.गिरीष महाजन यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

बंजारा व लमाण समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘संत सेवालाल महाराज बंजारा व लमान तांडा समृद्धी योजना’ ही महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाचे मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून व संतांच्या आशीर्वादातून सुरू केली आहे. यापुढेही बंजारा समाच्या विकासासाठी तत्पर राहून विविध कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ना.महाजन म्हणाले. यानिमित्त संकट मोचक ना. गिरीष महाजन यांचा सकल बंजारा व लमाण समाजामार्फत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यांची लाभली उपस्थिती

कार्यक्रमाला बंजारा समाजाचे काशी पोहरागड येथील परम पूज्य बाबुसिंग महाराज, वृंदावन धामचे गादीपती परमपूज्य गोपाल चैतन्यजी महाराज, जितेंद्र महाराज, श्याम चैतन्यजी महाराज, आनंद चैतन्यजी महाराज, रायसिंग महाराज, कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, शेखर महाराज, उदय महाराज, सुनील महाराज, हिम्मत महाराज, यशवंत महाराज, हिम्मत महाराज आदी महंतांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बंजारा समाजाचे बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here