गोपीचंद पाटील महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश

0
8

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील मल्लांनी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ खेळाडूंनी विविध गटात विजेतेपद तर ५ खेळाडूंनी उपविजेतेपद प्राप्त केले आहे. विजयी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचा निकाल असा- १४ वर्षाआतील (मुले) ओमकार श्रीराम पाटील (३८ कि.प्रथम), भावेश जितेंद्र पाटील (५७ कि.प्रथम), १४ वर्षाआतील (मुली) तनु वाल्मिक पाटील (४६ कि.प्रथम), १७ वर्षाआतील, फ्रीस्टाईल (मुले) कमलेश मनोज पाटील (४१ ते ४५ कि.प्रथम), जयदीप कैलास सोनवणे (५५ कि.प्रथम), सुनील भाऊसाहेब फासगे (७१ कि.प्रथम), भावेश मच्छिंद्र पाटील (४८ कि.द्वितीय), यश विकास पाटील (६० कि.द्वितीय), १७ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले) मोहन भाऊलाल हटकर (५१ कि.प्रथम), स्वराज प्रल्हाद चौधरी (५५ कि.प्रथम), तुषार सावता पाटील (४१ कि.द्वितीय), १७ वर्षाआतील (मुली) पूजा भक्तराज महाजन (३६ ते ४० कि.प्रथम), नंदिनी लक्ष्मण सूर्यवंशी (४६ कि.द्वितीय), पायल गोविंदा सूर्यवंशी (५७ कि.द्वितीय), १९ वर्षाआतील फ्री स्टाईल (मुले) धिरज शरद पाटील (५७ कि.प्रथम), अक्षय भगवान माळी (७४ कि.प्रथम), १९ वर्षाआतील ग्रीक रोमन (मुले) सुमीत सुरेश केदार (५५ कि.प्रथम), निवृत्ती ईश्वर पवार (६१ कि.प्रथम), १९ वर्षाआतील (मुली) पायल कैलास सोनवणे (५० कि.प्रथम) अशा यशस्वी खेळाडूंचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.

यांचे लाभले मार्गदर्शन

यशस्वी खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, कार्यवाहक रघुनाथ पाटील, रावसाहेब पैलवान, शरद पैलवान, बिऱ्हाडे पैलवान, बच्चू पैलवान, भावडू पैलवान, बापू.पैलवान, वाल्मिक पैलवान, महेंद्र पैलवान, कैलास पैलवान,सुनिल पैलवान, सुनील बिऱ्हाडे, मनोज पैलवान, जितेंद्र पैलवान, अण्णा पैलवान, प्रल्हाद पैलवान, सयाजी मदने, संतोष कराळे, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here