सौ शुभांगी पाटील यांची कजगाव येथे सदिच्छा भेट

0
49

 कजगाव   :  प्रतिनिधी

महाराष्ट्र टीचर असोसिएशन च्या संस्थापक तथा राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी  कजगाव येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत तेथील शिक्षकांची संवाद साधत व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच गावातील पत्रकार यांच्याशी संवाद साधला व जवळ असलेल्या श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त जाऊन दर्शन घेतले. सौ शुभांगी पाटील हे कजगाव येथून जवळच असलेल्या सार्वे बुद्रुक तालुका पाचोरा येथील माहेर असल्याने परिसरात परिचित आहेत. विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका सो शुभांगी पाटील यांनी केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक-श्री एम के पवार, नितीन पाटील, केदार सर, बी एस पाटील व शिक्षिकेतर कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष- भूषण पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here