खुशखबर : दिल्ली ते मुंबईतले LPG सिलिंडर ३६ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या

0
14

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

एक आनंदाची बातमी आहे.  एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) स्वस्त झाले आहेत. एलपीजी सिलिंडरचे नवे दर  (New Rates) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक (19 kg commercial cylinder) सिलिंडरच्या किंमतीत (Gas cylinder prices) कपात केली आहे. तब्बल 36 रूपयांनी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.

OMC ने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 36 रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन दर आजपासून लागू होतील. या नवीनतम कपातीमुळे, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2012.50 रुपयांऐवजी 1,976 रुपये झाली आहे. या नव्या किंमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू झाल्या आहेत.

जाणून घ्या नवीन किंमत

व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2021  रुपयांवरून 2012 रुपये करण्यात आली. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केल्यानंतर दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2012.50 रुपयांवरून 1976 रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, पूर्वी कोलकातामध्ये 2132.00 रुपयांना मिळत होते. मात्र 1 ऑगस्टपासून ते 2095.50 रुपयांना उपलब्ध होतील. व्यावसायिक सिलिंडरची किंमत आजपासून मुंबईत 1936.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 रुपये झाली आहे. 6 जुलै रोजी शेवटची दरकपात करण्यात आली होती.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थेच 

दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1053 रूपये आहे. याआधी 19 मे रोजी या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यानंतर किंमती 1003 रूपयांवरून 1053 रूपये करण्यात आल्या होत्या. सध्या कोलकात्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत  1079 रूपये, मुंबईत 1052 रूपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here