शेतकऱ्यांसाठी खुश खबर मान्सून पोहचला केरळमध्ये

0
11

साईमत पुणे प्रतिनिधी

अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता धोका नाही. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला होता. मात्र ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे त्या मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होणार आहे.

मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज ८ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. पुढील ४८ तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहोचणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हवामान खात्याने आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून केरळमध्ये आज म्हणजेच 8 जून रोजी दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळ, तामिळनाडू दक्षिण, कोमोरिन क्षेत्राचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here