सुखद वार्ता: 68 हजार शेतकऱ्यांना 75 टक्के पीक विम्याचा लाभ मिळणार

0
113

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश, वितरणाचे आदेश : रा.काँ.चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या माहिती

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर :

शेतकऱ्यांसाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 75 टक्के रकमेसाठी 68 हजार 850 शेतकऱ्यांना 41 कोटी 97 लाख, 24 हजार 104 रकमेचा पीकविमा मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली. जळगाव येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले आहे. रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली. अडचणीच्या वेळी महायुती शासनाने शेतकऱ्यांना विम्याचा हा आधार दिल्याने शेतकरी सुखावले आहेत.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे की, अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरलेला होता. अमळनेर तालुक्यातील आठही महसूल मंडळांना 25 टक्के अग्रीम रक्कम 56 हजार 621 शेतकऱ्यांना 41 कोटी 50 लाख, 41 हजार 664 रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर डी.बी.टी. द्वारे थेट खात्यावर जमा झालेले आहेत. फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानीचे पंचनामे झालेल्या एक हजार 714 शेतकऱ्यांच्या खात्यावर डी.बी.टी. द्वारे रक्कम सुमारे 10 कोटी 28 लाख, 956 रुपये खात्यावर जमा केले आहे. तसेच आता उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोगाच्याअंती अमळनेर तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळातील उर्वरित 75 टक्के रकेमेसाठी 55 हजार 824 शेतकरी पात्र झाले आहे. त्यांच्या खात्यावर सुमारे 36 कोटी, 9 लाख, 88 हजार 92 रुपये रक्कम जमा होईल.

अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर, शेळावे बु.या दोन महसूल मंडळातील 12 हजार 826 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 कोटी 87 लाख, 36 हजार 12 रुपये रक्कम ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ओरीएन्टल इन्शुरन्स प्रा.लि.कं. कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.म्हणजेच 68 हजार 650 शेतकऱ्यांना 41 कोटी 97 लाख, 24हजार 104 रुपये रक्कम मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

सर्व शेतकऱ्यांनी आपले बँकेचे खाते आधार कार्डाशी संलग्न (E- KYC) करुन घ्यावेत. ना. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर विधानसभा मतदार संघात खरीप पीक विमा 2023-24 या हंगामात शेतकऱ्यांना 84.51 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. ना. अनिल पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील असल्यानेच हा लाभ मिळाला आहे. खरीप पीक विमा मंजुर झाल्यामुळे खोट्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना चपराक बसली आहे.यावरून महायुती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यांचे मानले आभार

विमा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे, ना.गिरीष महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व विशेष करून राज्याचे कर्तव्यदक्ष मदत व पुर्नवसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांचे अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांवतीने भागवत पाटील यांनी जाहीर आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here