असोद्यातील शाळेत पीआय शशिकांत पाटील यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थी जीवनातील चांगले मित्र आणि मैत्रिणी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडील, शिक्षक आणि ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले. असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनाची जनजागृती विषयावर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
त्यांनी गुड टच-बॅड टच, आई-वडील व शिक्षक यांचे जीवनातील महत्व तसेच विद्यार्थी सुरक्षिततेसाठी उपलब्ध पोलीस हेल्पलाइन क्रमांक याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पी.जी. कोल्हे होते. विचार मंचावर ए.एस.आय. सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन जंगले तर आभार एल.जे. भुगवड्या यांनी मानले.
