२८, २९ सप्टेंबर रोजी अधिवेशनाचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील जैन हिल्स येथे २८ व २९ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशन आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा.स्मिताताई वाघ पाटील यांच्या हस्ते २८ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ३ वाजता उद्घाटन होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जैन इरिगेशन फाउंडेशन अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा व सत्र न्यायाधीश, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ. शिरीष चौधरी, अमोल जावळे, डॉ.केतकी पाटील, माजी महापौर अश्विन सोनवणे आदींसह अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शाह, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, केंद्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया, केंद्रीय सदस्य विजय सागर, माजी प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड,मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत उपाध्यक्ष विलास लेले, प्रांत संघटक प्रसाद बुरांडे, प्रांत सचिव संदीप जंगम, प्रांत सहसचिव विलास जगदाळे, जागरण आयाम प्रमुख विजय मोहरीर, प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल, प्रांत प्रतिनिधी उर्मिला येरवलकर, प्रांत सदस्य केदार नाईक, एन.ए. कुलकर्णी, समन्वयक दीपक इरकल, विनोद भरते कोषाध्यक्ष उपस्थित राहतील.
अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे संघटनेतर्फे आवाहन
तसेच ॲड.तुषार जी.झेंडे पाटील सदस्य ग्राहक संरक्षण परिषद व प्रांतीय अभ्यास मंडळ अध्यक्ष, डॉ.अशोक काळे संस्थापक सदस्य यांचे २९ सप्टें. रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ग्राहक न्यायमंच अध्यक्षा ॲड. छाया सपके, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, राज्य परिवहन विभाग प्रमुख भगवान जगणोर अन्न औषध विभाग प्रमुख हे मार्गदर्शन करणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्यावतीने केले आहे.