१० ग्रॅम सोन्यासाठी भाव १,६१,१९५ रुपये
साईमत/वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशातील सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या संकटामुळे आणि निर्यात-आयात ठप्प झाल्यामुळे सोनं-चांदीचे मार्केट अस्थिर झाले आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
युद्ध सुरू झाल्यापासून सराफ बाजारात सोन्याच्या दरात गेल्या 16 दिवसांत तब्बल 10 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर, चांदीच्या दरात 34 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज जळगावच्या बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 61 हजार 195 रुपये (जीएसटीसह) मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 63 हजार 680 रुपये लागणार आहेत.
आजच्या बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांच्या चढ-उतारानंतर घटून 1 हजार रुपयांनी घसरला आहे, तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली आहे.
बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचे विचार
सराफ बाजारातील या अस्थिरतेमुळे व्यापारी आणि सामान्य गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. युद्धाचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या किंमतीवर दिसत असल्याने मार्केटमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.
