गो.से. हायस्कूलला विविध स्पर्धांसह बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

0
34

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे खान्देशचे लोकनेते तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.आप्पासाहेब ओ.ना.वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. पाचवी ते सातवीच्या गटात स्लो सायकलिंग, १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची यासारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच शुद्धलेखन स्पर्धांसह रंगभरण स्पर्धाही आयोजित केली होती. आठवी ते दहावीच्या गटात निबंध, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविला. विविध स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सतीष चौधरी, माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी, बी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी स्व.आप्पासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. रुपेश पाटील, सागर थोरात यांनी ईशस्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यासह प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रणवी पाटील या दहावीच्या विद्यार्थिनीने आप्पा साहेबांचे कार्य व कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करून सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून व्ही.टी.जोशी यांनी स्व. आप्पासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कारकीर्दीचा गौरव केला. कार्यक्रमास मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर.ठाकरे, पर्यवेक्षक आर.एल. पाटील, ए.बी. अहिर, अंजली आर.गोहिल, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक प्रमुख रहीम तळवी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर. बी. बोरसे तर आभार रुपेश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here