साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव ।
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल बिलाखेड शाळेतील सातवीची विद्यार्थिनी ज्ञानदा सचिन सोनवणे (रा. चाळीसगाव) हिने मुंबई (अंधेरी) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. ज्ञानदाने १४ वर्ष आतील गटात सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेत ७ देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
ज्ञानदाच्या यशात चाळीसगाव येथील कुंगफू कराटे मास्तर फिरोज खान यांनी मार्गदर्शन केले. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलच्या प्राचार्य सिस्टर बिंदू अँटोनी यांनी तिचे ट्रॉफीसह पदक देऊन शाळेतर्फे गौरव केला. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
ज्ञानदा ही शास्त्रीनगर प्रभाग ४ च्या माजी नगरसेविका रंजना सोनवणे यांची नात, अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे, जि.प.कन्याशाळा कळमडू येथील गजश्री पाटील यांची ज्येष्ठ कन्या आहे.