सबगव्हाण टोल नाक्यावर येणाऱ्या स्थानिक वाहनांना आठवड्याच्या आत टोल मुक्ती द्या : अमोलदादा पाटील

0
30

टोलची तोड-फोड करून टोल बंद करण्याच्या सूचना

साईमत।पारोळा।प्रतिनिधी।

सबगव्हाण टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या आत पारोळा शहरासह सभोवतालील ग्रामीण भाग हे कार्यक्षेत्र येते. येथे दैनंदिन शालेय-महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, दैनंदिन रुग्ण, आपला उदरनिर्वाह भागविणारे कामगार, वाहन चालक ये-जा करतात. त्यात टोलच्या दरामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खिशाला कैची लागते. त्यामुळे हा टोलनाका सुरु झाल्यापासून दैनंदिन नागरिकांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन प्रवास करणारे वाहन धारक हे स्थानिक असल्याचे आवश्यक ते पुरावे सादर करीत असतात. परंतु तरीही टोलव्यवस्थापकाचा मनमानी कारभारामुळे टोलदर हा भरावाच लागतो.

आज या रस्त्यावर दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन धारक यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांना होत असलेला दैनंदिन त्रास हा लक्षात आणून दिला. त्यावर अमोलदादा पाटील यांनी नागरिकांसह टोलनाका गाठला.

दैनंदिन सुरु असलेली लुट बंद करा

दैनंदिन सुरु असलेल्या समस्यांना आपल्यामार्फत आजवर फक्त आश्वासने देण्यात आली. परंतु स्थानिक नागरिकांना कुठेही त्याचा लाभ देण्यात आला नाही. दैनंदिन सुरु असलेली लुट ही येत्या सात दिवसांच्या आत बंद करा, अन्यथा, टोलची तोड-फोड करून टोल बंद करण्याच्या सूचना अमोलदादा पाटील यांनी टोल व्यवस्थापकांना दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, या मार्गाने दैनंदिन रहदारी करणारे वाहन धारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here