Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»आदिवासी पेसा अंतर्गत भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय द्या
    चोपडा

    आदिवासी पेसा अंतर्गत भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय द्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 26, 2024Updated:August 26, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपड्यात ज्योती पावरा अन्‌ आदिवासी बांधवातर्फे जनआक्रोश मोर्चासह रास्ता रोको आंदोलन

    साईमत/चोपडा /प्रतिनिधी :

    आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिकांनी १३ जिल्ह्यातील १७ सेवा संवर्ग आदिवासी पेसा अंतर्गत भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा, आदिवासी बांधवातर्फे शासकीय विश्रामगृहापासून ते धरणगाव रस्त्यावरील तिरंगा चौकापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तिरंगा चौकात मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर रास्ता रोको ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि अनिता धनगर (उबाठा)हे सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्यावतीने ज्योती पावरा यांच्यासह नामसिंग शेवाळे, सलीम तडवी, प्रवीण पावरा व सुमारे ऐशी ते नव्वद स्वाक्षरी असलेले प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.

    यावेळी तहसीलदार थोरात यांनी मोर्चेकरी आंदोलकांना आपल्या भावना आजच राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई व शासन स्तरावरील वरिष्टांकडे तात्काळ कळविण्यात येईल, असे सांगितल्यावर ज्योती पावरा, डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे सांगितले. मोर्चेकरी आंदोलकामध्ये अन्यायाबाबत प्रचंड असंतोष धुमसत होता. आंदोलनवेळी शहर पोलीस स्टेशनचे पो. नि.मधुकर साळवे, त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

    सरळसेवेने भर जाणाऱ्या १७ सेवा संवर्गापैकी काहींचे निकाल लागलेले आहेत. तसेच निवड यादीही प्रसिद्ध झाल्या आहेत. काही पदांच्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची छाननी झालेली आहे तर काही पदांबाबतीत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. त्याकरिता मोर्चेकरी आंदोलकांच्या निवेदनातील मागण्यांमध्ये शिक्षक पदाकरिता पेसा क्षेत्रासाठी कागदपत्र पडताळणी झालेली होती. परंतु शासनाने पेसा भरतीला स्थगिती दिल्याने काही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच पडताळणी झालेल्या काही उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे निवड झाल्याने बिगर पेसा क्षेत्रात नियुक्ती दिली. त्यामुळे पवित्र पोर्टलला निवड न झालेल्या उर्वरित सर्व पात्रताधारक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्यात यावी. तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा पार पडली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली नसून अंतिम निवड यादी अजूनही जाहीर केलेली नाही. बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती केली आहे.

    उपवनरक्षक वनविभागाच्या पत्रांमुळे वनरक्षक पदासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत. प्रशिक्षणही सुरू आहे. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध आहे. कागदपत्र पडताळणीचे समुपदेशन दिलेले आहे. अशा उमेदवारांच्या अंतिम नियुक्त देणे अपेक्षित असल्याची मागणीही निवेदनात नमूद केली आहे.

    आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग पदासाठी परीक्षा निकाल व निवड यादी जाहीर केल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात आले. काही दिवस काम केल्यानंतर त्यांना पुन्हा पदावरून बाजूला करण्यात आले. ग्रामसेवक पदासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बिगर आदिवासी जिल्ह्यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. आरोग्य सेवक व आरोग्य सेविका जि.प. (फवारणी कर्मचारी) ४० टक्के आणि ५० टक्के पदासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

    बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती

    बिगर आदिवासींसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. कृषी सेवक पदासाठी परीक्षा १६ व १९ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली असून अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. पशुधन पर्यवेक्षक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध जाहीर केलेेली नाही. बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.