माणुसकी व्हॉट्‌‍सअप ग्रुपतर्फे रक्षाबंधनला महिलांना औषधीसह साड्यांची भेट

0
15

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर

घाटी येथील शासकीय रुग्णालयातील प्रसूती वार्ड, अस्थिव्यंग विभागामध्ये रुग्णालयातील महिला रुग्णांना ‘एक राखी एक साडी’ अशा स्तुत्य उपक्रमाअंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात आले. आवश्यक रुग्णांना औषधीसाठी १०० रुपयांची भेट देवून साड्यांची भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच माणुसकीचे दर्शन झाल्याचे समाधान वाटले. यावेळी ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली चॅपलीनच्या मुक आणि मुख अभिनयातून राखी बांधून घेऊन रूग्णांचा आनंद व्दिगुणीत केला. चार्लीने आपल्या मुखकलेतून हसवत रुग्णांना आत्मियतेने माणुसकीचे दर्शन घडवून देत धमाल केली.

भाऊ बहिणीच्या नात्याला नव्याने उजाळा दिल्याचे महिला रुग्णांनी भाऊक होत प्रतिक्रिया व्यक्त केली. माणुसकी व्हॉट्‌‍सअप गु्रप व सु-लक्ष्मीचे अध्यक्ष सुमित पंडित यांच्या मानवीय विचारातून कार्याची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाला अनेक शुभचितकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी रामेश्वर रेंगे, सचिन सानप, श्री.देशमाने, पोलीस निरीक्षक किरण आहेर, नालंदा लांडगे, सुदाम शिरसाठ, साहाय्यक पोलीस निरिक्षक उद्धव हाके, पोलीस उपनिरीक्षक श्री.बोडखे, घाटीचे गायनिक विभागाचे भिंगारे, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, प्रा.शरद सोनवणे, प्रवीण सोनवणे, गणेश जाधव, विजय चौधरी, द्वारकादास शामकुवर, माणुसकी समुहाचे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे, भरत कल्याणकर, लक्ष्मण शिंदे, उमाकांत वैद्य, अनिश रामपुरे, रोहित गव्हाणे, राम पंडित, पूजा पंडित, संगीता ईसनकर, लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समुहाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here