Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»घरकुल घोटाळा : ५९ कोटींच्या वसुलीसाठी आयुक्तांना हायकोर्टाकडून नोटीस
    जळगाव

    घरकुल घोटाळा : ५९ कोटींच्या वसुलीसाठी आयुक्तांना हायकोर्टाकडून नोटीस

    SaimatBy SaimatJune 18, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    घरकुल घोटाळा : ५९ कोटींच्या वसुलीसाठी आयुक्तांना हायकोर्टाकडून नोटीस
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव  प्रतिनिधी

    येथील हुडको घरकुल योजनाकामी ५९ कोटी रुपये बेकायदेशीरपणे खर्च करणाऱ्या तत्कालीन ४८ नगरसेवकांकडून प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली रक्कम वसूल करावी. याबाबत आयुक्तांनी १५ दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास आयुक्तांविरुद्धच पीआयएल दाखल करणार, अशी हायकोर्टाच्या वकिलामार्फत नोटीस सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना बजावल्याची माहिती देण्यासाठी शनिवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामुळे तत्कालीन नगरसेवकांमध्ये पुन्हा एकच खडबड उडाली आहे.

    सामाजिक कार्यकर्ता तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी शनिवारी सायंकाळी हॉटेल मोरक्को येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, ईश्वर मोरे, दिनेश भोळे, दिनेश भोळे, ललित शर्मा,आशिष जाधव आदी कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नाटेकर म्हणाले की, नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी ७ नोव्हेंबर २००२मध्ये घरकुल घोटाळ्याची चौकशी करून हुडको घरकुल घोटाळ्यात बेकायदेशीर रितीने ५९ कोटी खर्च केले. याबाबत विशेष लेखापरीक्षक नाशिक यांनी सदर ५९ कोटी रुपये वसुली पात्र असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच सदर रक्कम ही तत्कालीन ४८ नगरसेवकांकडून सामूिहक जबाबदारी व रक्कम निश्चित करून प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये इतकी वैयक्तीक रक्कम प्रत्येक नगरसेवकाकडून वसूल करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.

    ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी केले बेकायदेशीर ठराव

    नियमबाह्य व बेकायदेशीरपणे ठेकेदाराचे हित जोपासण्याकरिता तत्कालीन नगरपालिकेने १ ) ठराव क्र ३२८ दि. २५ ऑक्टोबर १९९७ २) ठराव क्र२७१,२७२, २७३, २७४, -ए २७४,बी, २७४ सी, २७४ डी, २७४ई, २७४ पी, २७४ एफ, २७४ जी, दि. २८ नोव्हेंबर १९९८व ठराव क्र २०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७, २८. दि. २४ एप्रिल १९९९अन्वये वेळोवेळी बेकायदेशीर ठेकादाराचे हित जोपासण्यासाठी ४८ नगरसेवकांनी दिली मान्यता. त्यामुळे वरील ठरावाच्या बाजूने मतदान केलेले असल्यामुळे व नगरपालिकेच्या हिताचा विचार न करता बेकायदेशीर ठरावास विरोध न दर्शवता नगरपालिकेच्या निधीचा गैरवापर केल्याचे सिध्द झाले आहे.

    आयुक्त गेडामांनी केला होता गुन्हा दाखल
    जळगाव जिल्हाधिकारी यांनी चौकशीअंती ७ नोव्हेंबर २००२ रोजी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेली हुडको घरकुल योजना नियमबाह्य व अनधिकृत असल्याचे नमूद केले होते.
    याबाबत १७ मार्च २००६ रोजी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी संपूर्ण घरकुल योजनेचे बांधकाम बेकायदेशीर असल्यामुळे गुन्हा दाखल करून दोषींना अटकही झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खडबड उडाली होती.
    ४८ नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित
    हुडको घरकुल योजनाच बेकायदेशीर घोषित केलेली असल्याने या योजनेसाठी हुडकोकडून प्राप्त ५९ कोटी रुपये नगरपालिका निधीत रुपांतरीत होऊन बेकायदेशीर खर्ची दाखवण्य्ाात आला आहे. त्यामुळे सदरची रक्कम वसुलीस पात्र आहे. त्यामुळे आपण या नगरपालिकेचा निधीचा दुरुपयोग केला असून सर्व ४८ नगरसेवकांकडून वसुलीस पात्र आहे. त्यामुळे वैयक्तिक जबाबदारी व रक्कम १ कोटी १६ लाख प्रत्येकी तत्कालीन नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

    हे आहेत घरकुल घोटाळ्यातील तत्कालीन दोषी नगरसेवक

    महेंद्र तंगू सपकाळे, अशोक काशिनाथ सपकाळे, चुडामण शंकर पाटील, अफजलखान रऊफखान पटवे, शिवचरण कन्हैयालाल ढंढोरे, चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चंद्रकांत उर्फ आबा शंकर कापसे, विजय रामदास वाणी, अलका अरविंद राणे, पुष्पा प्रकाश पाटील, डिगंबर दौलत वाणी, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, अजय राम जाधव, वासुदेव परशुराम सोनवणे, सुभद्राबाई सुरेश नाईक, इकबालोद्दिन पिंजारी, शांताराम चिंधु सपकाळे, देविदास बळीराम धांडे, अरूण नारायण शिरसाळे, भगतराम रावमल बालाणी, चत्रभुज सोमा सोनवणे, दत्तु देवराम कोळी, डिगंबर दलपत पाटील, कैलास नारायण सोनवणे, अशोक रामदास परदेशी, शालिग्राम मुरलिधर सोनवणे, लिलाधर नथ्थु सरोदे, गुलाबराव बाबुराव देवकर, पांडुरंग रघुनाथ काळे, लता रणजित भोईटे, मंजुळा धर्मेंद्र कदम, निर्मला सूर्यकांत भोसले, विमल बुधो पाटील, साधना राधेश्याम कोगटा, सुधा पांडुरंग काळे, सिंधू विजय कोल्हे, अलका नितीन लढ्ढा, मुमताजबी हुसेन खान, सुनंदा रमेश चांदेलकर, मीना अमृतलाल मंधान, रेखा चत्रभुज सोनवणे, भागीरथी बुधो सोनवणे, मीना अनिल वाणी, पुष्पालता शालीग्राम अत्तरदे, विजय पंडितराव कोल्हे, सदाशिव गणपत ढेकळे, प्रदीप ग्यानंचद रायसोनी.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026

    Pachora : विवाहितेच्या तक्रारीवर पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.