साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड येथे नाभिक समाजाची सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कोरमअभावी सभा तहकूब करून काही वेळानंतर तेथेच सभा घेण्यात आली. तसेच समाजातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी ॲड. शांतीलाल सैंदाणे होते. सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
समाजाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी त्यांच्या कार्यकारिणीत नवीन सदस्यांची निवड केली. त्यात प्रामुख्याने अनिल श्रावण अहिरे, योगराज काशिनाथ सोनवणे, सुखदेव संतोष वाघ, गुलाब बारकू ठाकरे, कृष्णराव अर्जुन वाघ, कैलास भास्कर अहीरे, विकास अशोक पगारे, जगन्नाथ बारकू सोनवणे, मांगो वना राऊत, शरद गजानन अहिरे, सुनील श्रावण अहिरे, शोभा रमेश जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच ॲड. शांतीलाल सौंदाणे यांनी “सांत्वन भोजन योजना” संस्थेमार्फत घोषित केले. संस्थेचा कार्यकाळ ५ वर्षाऐवजी ३ वर्षाचा करण्यात आला. तसेच नवीन सभासद फी फक्त १२६ रुपये ठरविण्यात आली. वरील तीन वर्षाचा कार्यकाळ व सभासद फी संस्थेच्या नियमावलीत बदल करून धर्मआयुक्त, जळगाव यांच्या आदेशाने पारित करण्यात येईल.
समाज प्रबोधन विषयक मार्गदर्शन
कार्यक्रमास ऑल इंडिया सेना नाभिक समाज ट्रस्ट नवी दिल्लीचे कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई प्रदेश संघटक रवींद्र बोरणारे, ॲड. शांतीलाल सैंदाणे यांनी समाज प्रबोधन विषयक मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू मोरे, ज्येष्ठ समाजसेवक भास्कर सन्नांसे, रमेश सोनवणे, ज्ञानेश्वर वाघ, नामदेव अहिरे, कल्पना अहिरे, सुनिता जाधव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.