चोपड्यात गावठी पिस्तूलसह दोन काडतूस जप्त ; आरोपी ताब्यात

0
25

चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

साईमत/चोपडा/प्रतिनिधी

चोपडा-शिरपूर रस्त्यावर बंद टोल नाक्याजवळ २३ ऑक्टोबर रोजी साडे आठ वाजता संशयित आरोपी आकाश गणेश चव्हाण (वय २४, रा.तळेगाव दाभाडे, पुणे, ह.मु. वाल्मिक नगर, पनवेल) याने मोटारसायकलने (क्र.एमएच१४- केएल ४३०३) गावठी बनावटीचे पिस्तूल (सिल्व्हर रंगाचा कट्टा) आणि पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्याने आकाश चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, त्यांच्या सोबत असलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), चोपडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि.एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे, योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि.जितेंद्र सोनवणे, पो.हे.कॉ.संतोष पारधी, श्री. शिंपी, ज्ञानेश्वर जवागे, पो.ना. संदीप भोई, पो.कॉ. प्रकाश मथुरे, पो.कॉ. प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनिकांत भास्कर, अक्षय सूर्यवंशी, समा तडवी यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here