जिल्हा कारागृहातील बंदीच्या चपलेत आढळला गांजा

0
34

जळगाव : प्रतिनिधी

येथील जिल्हा कारागृहात बंदी असलेला कैदी सिव्हिल हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारानंतर कारागृहात परत जात असताना त्याच्या तपासणीत चप्पलेत लपवलेला गांजा आढळून आला. याबाबत हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील संभाजीनगरातील विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर हा न्यायालयीन बंदी असून त्याला प्रकृती अस्वास्थामुळे कारागृहातून जिल्हा रुग्णालयातील कैदी कक्षात उपचारासाठी बुधवारी दाखल करण्यात केले होते. उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी शुक्रवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात परत नेण्यात आले. त्यावेळी त्याने घातलेल्या चप्पलमध्ये आठ ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी कारागृहातील हवालदार सुरेश बडगुजर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विठ्ठल हटकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विठ्ठल हटकर याला गांजा कुठून व कसा मिळाला याचा तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here