साईमत, नवापूर : प्रतिनिधी
नवापूर शहरातील मिरवणूक डीजे व डाँल्बीमुक्त करण्याच्या नवापूरचा गणेश मंडळांनी निर्धार केला आहे. गणेश मंडळांनी पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवून नवापूर शहराची आदर्श मिरवणूक परंपरा कायम ठेवा असे आव्हान नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केले. नवापूर पोलीस ठाणे येथे आयोजित मंडळाचा पदाधिकारीच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलीस अधीक्षक-पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात बैठक संपन्न झाली. डॉल्बी व डीजे च्या आवाजाने मानवी शरीरात होणाऱ्या विपरीत परिणाम यावेळी स्पष्ट करण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केलेल्या आव्हानाला सर्व मंडळांनी एका सुराने प्रतिसाद देत गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व डॉल्फीमुक्त करण्याच्या गणेश मंडळांनी निर्धार केला.
गणेश उत्सवाची जयत तयारी नवापूर शहरात सर्वत्र सुरू आहे शहरात सर्व गणेश मंडळे मंडप उभारणी,विद्युत रोषणाई लावणे,आरस तयार करणे या कामात मग्न झाले आहेत. तर प्रशासना तर्फे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे नंदुरबार जिल्हाचे पोलिस अधिक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाने नवापूर पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या दालनात २९ गणेश मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गणेश मंडळच्या अध्यक्ष व पदधिकारी यांनी नवापूर नगरपालिकेचा काम बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.शहरात रस्त्याची दयनीय अवस्था,मोकाट गुरांचा प्रश्ना बाबत मंडळाचा पदाधिकारींनी पोलिस निरीक्षक वारे यांचा समोर आपले म्हणणे मांडले.यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे म्हणाले की यावर्षी नवापूर शहराचा हद्दीतील गणेश मंडळानी डीजे-डॉल्बी न लावण्याचा सुचना दिल्या.सर्व गणेश मंडळाच्या पदधिकारी यांनी श्री गणेश उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करावा.गुलालाची उधळ न करता फुलांचा वर्षाव करावा.तसेच नवापूर शहरातील रस्ते,मोकाट गुराचा संदर्भात मुख्यधिकारी यांच्याशी चर्चा करुन सर्व समस्या मार्गी लावणार असे श्रीगणेश मंडळाच्या पदधिकारीना वारे यांनी सांगितले. या बैठकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.



