काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अधिकृत नियुक्तीपत्र प्राप्त
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी गणेश राजाराम झाल्टे (माळी) यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र गेल्या २८ जून रोजी प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोदवडचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर नेरकर, ॲड.राजीव चोपडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून जामनेर शहर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा रंगली होती. अखेर काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या बैठकीनंतर ही नियुक्ती निश्चित केली आहे. काँग्रेसच्या निष्ठावान आणि संघर्षशील कार्यकर्त्यांमध्ये गणेश झाल्टे यांची ओळख आहे. तसेच त्यांनी स्थानिक राजकारण आणि काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांत विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जनसंपर्क, संयमित स्वभाव आणि संघटन कौशल्य यामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी विशेष स्थान मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. विशेषतः आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसकडून त्यांची नियुक्ती केली आहे.
तरुण अन् नवमतदारांपर्यंत पोहोचण्याची आली जबाबदारी
पक्षाच्या अंतर्गत संघटन मजबूत करण्याबरोबरच विरोधकांना रोखण्यासाठी त्यांच्याकडून नवे धोरण आखले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. याशिवाय, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना बरोबर घेत तरुण आणि नवमतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला शहरात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
अनेकांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.जगन लोखंडे, तालुकाध्यक्ष शरद पाटील, शंकर राजपूत, ज्योत्स्ना विसपुते, विलास पाटील, मुलचंद नाईक, ईश्वर रोकडे, सुनील घुगे, शरद पवार, जग्गू बोरसे, संदीप पाटील, हरिष पाटील, किरण पाटील, मुसा पिंजारी, रफीक मौलाना, दीपक राजपूत, सुभाष भागवत आदींनी गणेश झाल्टे यांचे अभिनंदन केले आहे.