Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा
    जळगाव

    जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    शहरालगतच्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील “टोडलर टेल्स”मधील प्लेग्रुप व नर्सरीचे विद्यार्थीही जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, बालगीत, वेशभूषा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वप्रथम शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

    यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी टोडलर टेल्सच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून शिक्षकांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते. या दरम्यान, इयत्ता पाचवीसाठी बॉल थ्रो, सहावीसाठी दोरी उडी, इयत्ता सातवी व आठवीसाठी क्रिकेट आणि प्रश्‍नमंजुषा आदी खेळांचे आयोजन केले होते. प्रत्येक स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
    बालदिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांनी नृत्य सादरीकरणाने उपस्थित विध्यार्थ्यांचे मनोरंजन करत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षिका अल्फिया लेहरी यांनी मांडले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन शिक्षिका तस्लीम रंगरेज यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.