स्पर्धेत ६० फिडे गुणांकाच्या खेळाडूंसह १६० सहभागी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जी. एच. रायसोनी यांच्या स्मरणार्थ आयोजित जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. जळगाव बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला व मध्यप्रदेश येथील ६० फिडे आंतरराष्ट्रीय गुणांक असणारे खेळाडू सहभागी झाले. १६० खेळाडूंनी खुल्या वयोगटासह ९, ११, १५ वर्ष वयोगटात आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पारंपरिक पटावरून केले. खुल्या वयोगटासह पंधरा वर्षे खालील वयोगटात आठ फेऱ्या तर नऊ व अकरा वर्ष वयोगटात सात फेऱ्या घेण्यात आल्या. खुल्या वयोगटात प्रा. तेजस तायडे यांनी ५ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. नऊ वर्षे वयोगटात निशांत कवडे (छत्रपती संभाजीनगर), अकरा वर्ष वयोगटात रुद्र तायडे (जळगाव), पंधरा वर्षे वयोगटात कौस्तुभ भास्कर वाघ (छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक, चषक व मेडल खेळाडूंना कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डिन संजय शेखावत, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, राज्य संघटनेचे सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, हरिष शिरसाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी खेळाडूंना बुद्धिबळाच्या प्रसार व प्रचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली.
महाविद्यालयाचे रजिस्टर अरुण पाटील उपस्थित होते. प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांच्यासह सहायक पंच आकाश धनगर, दिनेश ठाकरे, जयेश वेद, आकाश पिंपळे, दीपक सावळे, सुमित सोनवणे, तन्मय कोळी, बंडू काळे यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. प्रास्ताविक स्पर्धेचे क्रीडा समन्वयक सागर सोनवणे तर सूत्रसंचालन पंच प्रवीण ठाकरे यांनी केले.
स्पर्धेतील विजेते असे
स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये खुला वयोगटात प्रा. तेजस तायडे (जळगाव), विवेक चव्हाण (शहादा), संदीप साळवे, तसीन तडवी, जयेश निंबाळकर, मितेश जेठवा (अमळनेर), प्रा. सोमदत्त तिवारी, महेश चौधरी, अक्षय सावदेकर, भारत आमले, ९ वर्षे वयोगटात: निशांत कवडे, अभंग सोनवणे, करन खराडे (बुलढाणा), ध्रुव जगताप, आरुष पाटील, पियुष माने, अभिर पत्की (बुलढाणा), मृगंक पाटील, रंनजयसिंग राजपूत, दुर्वेश ठाकूर (धुळे), कृष्णा खराडे (बुलढाणा), हिमांशू पवार, यथार्थ सिंग, अद्विक शिरसागर, रोनव अग्रवाल, हार्दिक रावलानी, ११ वर्षे वयोगटात : रुद्रांश तायडे, अंकित पळहल (छत्रपती संभाजीनगर), जयदीप पाटील (नंदुरबार), संस्कार शिरसाठ (बुलढाणा), नैतिक मुनोत, वेदांत पाटील, युवान आसावा, ख़ुशी माने (छत्रपती संभाजीनगर), गोरक्षा चौधरी, स्वामी चव्हाण, येशी आयुष (नंदुरबार), हिमांशू बाविस्कर, दुर्वेश पाटील, श्रीराज वानखेडे, कुणाल गिरासे (दोंडाईचा), १५ वर्षे वयोगटात : कौस्तुभ भास्कर वाघ (छत्रपती संभाजीनगर), प्रथम गवळी (नंदुरबार), अर्णव मंडोरे, अंगद मंगलानी, आरव कुलकर्णी, दुर्वेश कोळी, क्षितिज वारके, चिन्मय मगर, आदित्य झवर, मंदार पाटील, रोहित बयास, श्लोक वारके, आदित्य गुजराथी, तिलक सरोदे, तेजल नारखेडे यांचा समावेश आहे.
