जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला शिक्षण मंत्रालयाचे ‘३ . ५’ स्टार’ रेटिंग
जळगाव (प्रतिनिधी ) —
शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटला केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमाचे परीक्षण करून भारत सरकारने सलग तिसऱ्या वर्षी ‘३.५’ स्टार रेटिंग’ देऊन सन्मानित केले.
दरवर्षी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे भारतातील महाविध्यालयांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी हे रेटिंग दिले जाते. यंदा देशभरातून ५,४५५ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात ‘३.५’ मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
तंत्रशिक्षणात रायसोनी इन्स्टिट्यूट सतत नवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख उंचावत असते. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ ने रायसोनीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले. इंडस्ट्री ४.०, स्टार्ट-अप, इटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट, डिझाईन थिंकिंग, क्रिटीकल थिंकिंग, पेटेंट फायलिंगसारख्या आधुनिक विषयांची चर्चासत्रे व कार्यशाळा भरविण्यात आल्या होत्या. या उपक्रमांचे ‘ऑल इंडिया कॉन्सिल’च्या तज्ञ समितीने परीक्षण करून थ्री.फाईव्ह’ स्टार रेटिंग’ देवून गौरविले. वार्षिक कामगिरीवरून हे रँकिंग ठरवले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे हे रेटींग प्राप्त झाले संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे. या यशामुळे रायसोनी इन्स्टिट्यूटची मान उंचावली असून अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.