बोदवड तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी जी.बी.भोई

0
29

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

येथील न.ह रांका हायस्कुलमध्ये जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनाअंतर्गत बोदवड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एच.जी.इंगळे होते. याप्रसंगी जळगाव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष तथा जिल्हा सचिव एस.डी.भिरूड, कला अध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण सपकाळे, जिल्हा निरीक्षक एस.के.पाटील, शारीरिक शिक्षक महासंघ राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव डॉ.प्रदीप साखरे, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक डॉ.संजय निकम, भुसावळ पतपेढीचे संचालक ज्ञानेश्‍वर मोझे, अमित परखड, रां.का.हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एन. ए.पाटील, माजी पर्यवेक्षक बी.यु.पानपाटील, पर्यवेक्षक आर.के.तायडे आदी उपस्थित होते.

जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी जी.बी.भोई (न.ह.रांका हायस्कुल, बोदवड), उपाध्यक्ष मुकेश बरडे (चि.स.महाजन हायस्कुल, जामठी), महिला उपाध्यक्ष प्राजक्ता चंद्रे (के.जी.पाटील हायस्कुल, नाडगाव), सचिव महेंद्र कोळी (गो.दे.ढाके विद्यालय, एणगाव), संघटक चिटणीस आय.पी.बागुल (नूतन माध्यमिक विद्यालय, हरणखेड), कोषाध्यक्ष एन.यु.बागुल (न.ह.रांका हायस्कुल, बोदवड), क्रीडा चिटणीस ए.एम.खोसे (कै.अ.च.पाटील हायस्कुल, मनुर) तर सदस्यांमध्ये किशोर शेळके, सत्यजित राम नेमाडे (हायस्कुल बोदवड), अमोल नाईक (रां.का.हायस्कुल, बोदवड), वार.डी.बाविस्कर (बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, शेलवड), ए.एस.खान (उर्दू हायस्कुल बोदवड) यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.

याप्रसंगी एस.डी.भिरूड, एस.के.पाटील, एन.ए.पाटील, बी.यु.पानपाटील यांनी मनोगतातून संघटनेची कार्यपद्धती आणि संघटनेकडून मिळालेल्या अनेक फायदे व भविष्यात येणाऱ्या समस्या यासंदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात एच. जी.इंगळे यांनी संघटनेच्या कार्याबद्दल व संघटनेने शिक्षकांसाठी केलेले आंदोलने त्यातून होणारे अनेक फायदे व संघटनेचा लेखाजोखा त्यांनी मांडला. याप्रसंगी नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र साखरे यांना देण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल बोदवड तालुक्याच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

यशस्वीतेसाठी माजी तालुकाध्यक्ष आर.एस.जैस्वाल, एस.के.राणे, एच.एम.कुरेशी, व्ही.व्ही.पाटील, आर.एस.अग्रवाल, सुनील घडेकर, अंकित बोरसे, भूषण भोई, श्री.चव्हाण, के.डी.मिस्तरी, दीपक माळी, मुरलीधर मिस्तरी यांच्यासह तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.संजय निकम तर आभार ज्ञानेश्‍वर मोझे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here