Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»agricultural sector in Fali : फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक 
    कृषी

    agricultural sector in Fali : फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक 

    Vikas PatilBy Vikas PatilApril 29, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक 

    जळगाव (प्रतिनिधी) –

    वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर वाढत आहे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. भविष्यातील शेती करण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची निर्मिती ज्या ज्या पिकांमध्ये शक्य आहे त्यात केले पाहिजे. यासाठी अॅग्रीटेक इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले ते खऱ्या अर्थाने देशाचे भविष्य आहे प्रतिपादन स्टार अॅग्रीचे स्वतंत्र संचालक डॉ. बी. बी. पट्टनायक यांनी केले.

    शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ च्या अकराव्या अधिवेशनच्या पहिल्या सत्राचा आज समारोप झाला. इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डॉ. बी. बी. पटनायक बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परिक्षकांसह फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अॅग्रीवाईज कंपनीचे सुरज पानपट्टे, युपीएलचे गणेश निकम, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ. रमेश पटाले, डॉ. विनोद चौधरी, अभिमुन्य ढोले, शैलेंद्र जाधव, अंकिता, दिवीसायी गौतम, प्रमोद उपाध्याय डॉ. गिरष गौतम-आयटीसी, अरूण श्रीमाली, नरेज पाटील- प्रोम्पट, मोहम्मद तौफीक, वैभव भगत-उज्जीवन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, किशोर रवाळे हे उपस्थित होते.

    मान्यवरांच्या हस्ते दोघंही स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. माजी फाली विद्यार्थी व शिक्षकांसह सहकार्य करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. समूह चर्चेतून आरव बंडी, देविका, दादासो नलवाडे, सिद्धी शिंदे, आदर्श मोहळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी प्रतिक रजोले, स्वप्नील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेंद्र जाधव, अरूण श्रीमाली, डॉ. विनोद चौधरी, मोहम्मद तौफिक या कंपनी प्रतिनिधींनीसुद्धा संवाद साधला.

    डॉ. बी. बी.पट्टनायक म्हणाले की, क्लायमेंट चेंजसह कृषी तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत त्याच धर्तीवर फालीच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले हे कौतूकास्पद आहे. शेतकऱ्यांची मुलं ही शेतीपासून दूर जात आहेत मात्र जीवनाचे साधन हे शेती आहे हे मूळ समजले पाहिजे. प्रक्रिया करून शेतमालाचे मूल्यवर्धन केले पाहिजे त्यासाठी शीतगृहांसह गोदामांचा वापर केला पाहिजे जेणेकरून बाजारपेठातील भावांमधील चढ उतार यावर व्यवहारीकदृष्ट्या मात करता येईल.

    शेती, शेतकऱ्यांबद्दलची आवड कायम ठेवा – अतुल जैन
    शेत, शेतकऱ्यांबद्दलची आवड यातूनच फाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. जे शेतीनिष्ठ व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मोलाची ठरू शकते. ज्या योजना समोर आल्यात त्यात फाली विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांवर सोल्यूशन देण्यासाठीची आत्मयिता दिसून येते. ही आवड कायम ठेवावी व कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणावे, यासाठी कृषी शिक्षकांसह मार्गदर्शकांची महत्त्वाची भूमिका आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.

    फाली अकरावे अधिविशेनच्या पहिल्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून ६१ इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. खतांमध्ये भेसळ चाचणी किट तयार करणाऱ्या अनुभूती इंटरनॅशनल रेसिन्डेंशीअल स्कूल, जळगाव (फर्टिलायझर-अॅडलचेरेशन टेस्टिंग किट) संपूर्ण प्रथम आहे. जि.प. मुलींचे हायस्कूल, अमरावती ( फ्रुट पीकर अॅण्ड कलेक्टर) द्वितीय, स्वामी विवेकनंद विद्यामंदीर, देहड, जालना (आयओटी बेस स्मार्ट फार्मिंग मॉडेल) तृतीय, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्जना घाट अमरावती चतुर्थ, जिजामाता हायस्कूल खापा, नागपूर (स्मार्ट ग्रीन हाऊस) पाचव्या क्रमांकाने विजयी झाले.

    बिझनेशन प्लॅन सादरीकरणातील विजेते
    जैन हिल्सच्या परिश्रम हॉल, बडी हांडा हॉल, गांधी तिर्थच्या कस्तूरबा हॉलसह क्लासरूमध्ये एकाच वेळी फालीच्या विद्यार्थ्यांनी बिझनेशन प्लॅन चे सादरीकरण केले. कमीतकमी भांडवल वापरून रोजगार निर्मितीसह शेतीपूरक उद्योग उभारणीसाठी ६१ उत्तम व्यावसायिक मॉडेल फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यात प्रथम क्रमांकाने नवमहाराष्ट्र विद्यालय, पंदारे पुणे (लिटल लिफ स्टुडिओ), दाणोली हायस्कूल कोल्हापूर (दि कॉफी) द्वितीय, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्णा घाट अमरावती (ट्रेझर ऑफ रागी) तृतीय, नवजीवन सेकंडरी आश्रम स्कूल आंबातांडा छत्रपती संभाजीनगर (कॉटन पॅलेट्स) चतुर्थ, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर पुणे (अॅग्रीवेस्ट टू इको बेस्ट) पाचव्या क्रमांकाने विजयी झाले. नॅन्सी बॅरी यांनी आभार मानले. रोहिणी घाडगे, हर्ष नौटियाल यांनी सूत्रसंचालन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Jamner : चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन गरजूंना ब्लॅकेट वाटप.

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.