साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
रस्ते, गटार, वॉटर आणि मीटर अशा विकास कामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती जनतेला मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध आहे. त्यामुळे विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले. चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे गावातील २ कोटी ६५ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून २५ लाखांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील १६१ हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, मार्केट कमिटीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनवणे, रवी आबा पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, किसान मोर्चाचे अध्यक्ष विजय पाटील (पिलखोड), ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा दगडू पाटील तसेच दगडू पाटील, उपसरपंच गोरख पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, सुनील पाटील तसेच मार्केटचे संचालक रवींद्र पाटील, संभाजीराजे पाटील, विकासोचे चेअरमन जितेंद्र पाटील, संजय गांधी योजना कमिटीचे आबा बछे सायगाव, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सायगावच्या सरपंच कमलाबाई भिल्ल, पिलखोड सरपंच यशवंत यशोद, उपसरपंच गोकुळ रोकडे, उपखेडचे सरपंच छोटूभाऊ मगर, गोरख आप्पा पाटील, ज्ञानेश्वर पाटील अलवाडी, दिनेश माळी सायगाव, नाना धर्मराज, विकासोचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, नामदेव पाटील, वसंत पाटील, दगडू पाटील, वाल्मिकी पाटील, सयाजी पाटील, पोलीस पाटील विष्णू पाटील तसेच वासुदेव पाटील, कैलास पाटील, महेंद्र पाटील, डॉ.संदेश महाजन, दगडू पाटील, महेश पाटील, महेश भावसार, पिनू आबा, राजू टेलर, गोरख पाटील, बूथ प्रमुख योगेश पाटील देशमुखवाडी, निहाल मन्सूरी, सोपान अहिरे आदी उपस्थित होते.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपुजन
यावेळी आ.मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते मांदुर्णे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत ८६ लाखांची पाणी पुरवठा योजना, पिलखोड ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (७४.३९ लाख), साकुर फाटा ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (३० लाख), मुलभूत सुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (२५ लाख) व सभामंडप बांधकाम करणे (२० लाख), जि.प.शाळा खोली बांधकाम करणे (१२.१५ लाख) शिवाजी पाटील ते छगन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (१० लाख), सायगाव व मांदुर्णे नदीतून जाणाऱ्या नवीन कृषी वीज वाहिनीचे काम करणे (८ लाख) आदी कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले. तसेच मांदुर्णे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाना ७३ रेशनकार्ड व ४९ जातीचे प्रमाणपत्र, अलवाडी येथील २५ कुटुंबाना रेशनकार्ड, सायगाव येथील १४ कुटुंबाना जात प्रमाणपत्र, भवाळी येथील ०६ कुटुंबाना जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.