Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»Muktainagar : मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी ३८५ कोटींचा निधी मंजूर
    मुक्ताईनगर

    Muktainagar : मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी ३८५ कोटींचा निधी मंजूर

    saimatBy saimatApril 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला

    साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी

    आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी तब्बल ३८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा परिसरासाठी विकासातील मोठा टप्पा मानला जात आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. या कामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले, ज्याला अखेर आता यश आले आहे. या निधीमुळे मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

    आज मुंबई येथे झालेल्या संयुक्त बैठकीत जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.

    या निधीतून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे, नरवेल, पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा, शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आंदलवाडी या गावातील रखडलेल्या नागरी सुविधांना गती मिळणार आहे.

    आ. चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कित्येक दशकांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये नव्या विकासाची उमेद वाढली असून, लवकरच गावातील पुनर्वसन कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    या निधी मंजुरीने मुक्ताईनगरसह तालुक्याच्या अनेक गावांना सांभाळलेल्या नागरी सुविधांचा नवविकास आणि पुनर्वसनाच्या योजना त्वरित सुरू होण्याची शक्यता निर्माण केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.