जामनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. ग्रामरोजगार सेवकांना फिक्स मानधन मिळत नाही. तसेच त्यांना कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात. त्या मिळत नाहीत. तसेच इतरही प्रलंबित मागण्या असून त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाचा निश्चित विचार करून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शांताराम जाधव, प्रभाकर पाटील, युवराज बाविस्कर, रमेश पाटील, प्रवीण तायडे, अनिल पाटील, सचिन सोळंके, राहुल भोळे, गोपाल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ गाभे, सुधाकर राऊत, राहुल महाजन, गणेश किंनगे, सुनील कवरसिंग, बी.बी.सोनवणे, श्याम राठोड, चंद्रशेखर कोळी, सुरेश नवघरे, श्री.इंगळे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.