दरोडयातील फरार आरोपी जेरबंद

0
88

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

जळगाव जिल्हयासह इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला जेरबंद करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ताब्यात घेतल्यानंतर त्यास गुन्हयाच्या पुढील तपासा कामी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.

त्यांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील प्रमोद लाडवंजारी , किरण धनगर यांना यावल भागातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. पोहवा प्रमोद लाडवंजारी , किरण धनगर यांना निमगाव ता. यावल गावातुन गोपीनीय माहिती प्राप्त झाली की, तळोदा पोलीस स्टेशन जि. नंदुरबार गुर नं. ३१/२०२३ भादवि कलम ३९५,३९४,३४२,५०६ प्रमाणे दाखल दरोडा या गुन्हयातील आरोपी आशिष तायडे यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल असुन तो गुन्हा घडल्यापासुन फरार आहे व तो त्याचे अस्तित्व लपुन छुप्या पध्दतीने गावात राहत आहे.

प्राप्त गोपीनीय माहीतीवरुनपोहवा प्रमोद लाडवंजारी व पोहवा किरण धनगर यांनी निमगाव ता.यावल या गावात सापळा रचुन अशिष तायडे हा त्याचे राहत्या घराच्या गल्लीमध्ये उभा असताना त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने नाव आशिष विलास तायडे (वय २५ वर्षे रा. निमगाव रा.यावल) असे सांगितले. आशिष तायडे यास ताब्यात घेतल्याबाबतची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवुन त्यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस स्टेशन तळोदा जि. नंदुरबार यांना कळविले असता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे पोहवा २१८ देविदास वडवी सोबत पोलीस पथक आल्याने गुन्हयाच्या पुढील तपासा कामी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक, फैजपुर अन्नपुर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here