भुसावळहून विशेष रेल्वे गाडीने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर :

जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येथे येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला रवाना झाले. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून मंगळवारी, १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजता पंढरपुरसाठी जाणाऱ्या गाडीस भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली.

“विशेष आषाढी रेल्वे” गाडी बुधवारी, १७ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल तर रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून परतीला निघणार आहे. गुरुवारी, १८ जुलै रोजी भुसावळ येथे परतणार आहे. अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे राज्यमंत्री श्रीमती खडसे यांच्यामार्फत जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली. ही सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत असणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here