अंबिलहोळला आयोजित आरोग्य शिबिराप्रसंगी श्याम चैतन्यजी महाराज यांचा साधकांना उपदेश
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
सर्वांचे आयुष्य निरोगी व निरामय राहो, यासाठी डॉक्टर हे देवदूतच असतात. मात्र, त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार आपण स्वतःचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. व्यसनापासून मुक्तता तसेच सकस आहार या दोघांच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगले पाहिजे. “सबके आरोग्य की कामना, यही आज के दिन की साधना !” या माध्यमातून आजचा दिवस जन सामान्यांसाठी निरामय आयुष्य आणि त्यांच्या मनोकामनासाठी समर्पित करतो, असे आशीर्वचन श्याम चैतन्यजी महाराज यांनी दिले.
ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे कृपा पात्र शिष्य तसेच गुरुदेव सेवाश्रम चैतन्य धामचे गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जीएम फाउंडेशन तसेच न्यू रुबी स्टार हॉस्पिटलच्या संयुक्त माध्यमातून अंबिलहोळ देवी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांना साधकांना उपदेश केला.शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी जामनेर नगरीच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन तसेच जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रवीण राजनकर, दौलत पवार, रामचंद्र नाईक, शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी पूनमचंद चव्हाण, रामचंद चव्हाण, सुधाकर पवार, भाऊसाहेब राठोड़, गोकुल चव्हाण, नटवर चव्हाण, दिलीप चव्हाण, भाईदास चव्हाण, अविनाश पवार, शत्रुघ्न चव्हाण, उपसरपंच देवीदास चव्हाण, विकास पवार, सुधाकर पवार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश चव्हाण तर आभार विश्वनाथ चव्हाण यांनी मानले.