साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डॉ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल(द्वारका, नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय येथे रविवारी, ३ सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची माहिती पोट व यकृत विकार तज्ज्ञ डॉ.शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता देशमुख यांनी दिली.
शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य विविध तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांनी नाव नोंदणीसाठी ८०८०८८३०७४ /९८८१४१४१३९ किंवा ०२५३-२५०६५९९ या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. शिबिराला कुऱ्हाड ग्रामपंचायत, विकास सोसायटी व आदर्श हायस्कूल, स्थानिक डॉक्टर्स, कृष्णा लॅब तसेच कुऱ्हाड ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे. महागड्या चाचण्याही मोफत करण्यात येणार असल्याने रुग्णांसाठी सुवर्णसंधी असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पोट व लिव्हर तज्ज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी केले आहे.